८० हजार शाळा बंद करण्याचे सरकारचे उद्दिष्ट नाही : विनोद तावडे

रायगड माझा

येत्या १५ वर्षात राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही उद्दिष्टं नसून या सर्व अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असे टि्वटरवरून स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिले.
येत्या १५ वर्षांत राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असे मत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाने व्यक्त केले नसल्याचा दावाही त्यांनी केला. शाळा बंद करण्याचे सरकारचे कोणतेही धोरण नाही, असे सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुखांच्या बैठकीसाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार रविवारी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी सरकारी शाळांबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची आगामी वाटचाल स्पष्ट करताना राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असे मत व्यक्त केले होते. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने तावडे यांनी टि्वट करून खुलासा केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत