९ वर्षाच्या मुलीला पॉर्न व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी 22 वर्षीय मोलकरणीला अटक

मुंबई: रायगड माझा 

मुंबईतील साकानाका पोलिसांनी एका 22 वर्षीय मोलकरीण तरूणीला एका 9 वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने पॉर्न व्हिडिओ दाखविल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या तरूणीचा मोबाईल जप्त करून त्याच्या तपासणीसाठी पाठवून दिला आहे.

असे समोर आला प्रकार-

– साकीनाका पोलिसाच्या माहितीनुसार, आईला मागील 15 दिवसापासून मुलीच्या वागण्यात बदल होत असल्याचे लक्षात येत होते. आईने खूप प्रयत्न करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र खरे कारण समोर येत नव्हते. अनेकदा विचारपूस करूनही मुलगी हो-नाही असे उत्तर देत होती.

– आईने पुन्हा एकदा 26 एप्रिल रोजी मुलीला काय समस्या आहे हे विश्वासात घेऊन विचारले. अखेर मुलीने सत्य सांगतिले व तिने आपल्या घरात राहत असलेली मोलकरीण तिच्या मोबाईल फोनवर वारंवार पॉर्न दाखवत आहे.
– मुलीने आईला सांगितले की, मागील काही दिवसापासून तुम्ही लोक कामावर गेले की मोलकरीण मला सतत अश्लील व्हिडियो पाहायला लावत आहे.

जानेवारीपासून मुलीची करतेय देखभाल-

– चौकशीत समोर आले आहे की, जानेवारी महिन्यात या कुटुंबाने 22 वर्षीय युवतीला (मोलकरीण) आपल्या घरी कोणी नसताना मुलीची देखभाल करण्यास ठेवले होते.

अनेक व्हिडियो क्लिप जप्त-

– हा प्रकार समोर येताच मुलीच्या आईने साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये मोलकरणीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
– साकीनाका पोलिसांनी या घटनेची गंभीरता पाहता 27 एप्रिल रोजी मोलकरणीला घरातून ताब्यात घेतले.
– पोलिसांनी तिच्या मोबाईल फोनमधून अनेक अश्लील व्हिडिओ क्लिप जप्त केल्या आहेत. सध्या तिचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत