ॲपल’कंपनीच्या शेअरनी घेतली चांगलीच उसळी, गाठला १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा

सॅन फ्रान्सिस्को

स्मार्टफोन, संगणक विक्रीत आघाडीवर असलेल्या ‘ॲपल’ने आज १ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असलेली अमेरिकेतील पहिली कंपनी होण्याचा मान पटकाविला आहे. जूनमधील तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअरनी चांगलीच उसळी घेतली आहे. गेल्या तीन दिवसांत कंपनीचे शेअर सुमारे ९ टक्‍क्‍यांनी वधारले असून, परिणामी कंपनीचे बाजार भांडवल १ ट्रिलियन डॉलरवर गेले आहेत. आज सुरवातीला कंपनीच्या शेअरमध्ये किरकोळ स्वरूपात घसरण नोंदविली गेली; मात्र लगेचच ते पुन्हा सावरले. दरम्यान, आगामी काळात ॲमेझॉन व अल्फाबेट या कंपन्या ‘ॲपल’ला मागे टाकण्याची शक्‍यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत