🔴 LIVE : अटलजींच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ९३ व्या वर्षी गुरुवारी दीर्घ आजाराने निधन  झाले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल झालंय…

 

इथे दुपारी १.०० वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. दुपारी १.०० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी ४.०० वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजप मुख्यालयात आणण्याअगोदर अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील ६-ए कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं.

अटलजींच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत भाजपाचे दिग्गज नेते आणि जनसागर लोटला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेदेखील अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत.

 

दुपारी  ०१.३५ : वाजपेयींची अंत्ययात्रा राष्ट्रीय स्मृती स्थळाकडे रवाना

सकाळी १२.१३ :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले


सकाळी ११.३५ :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन


सकाळी ११.०५ : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल… दुपारी १.०० वाजेपर्यंत भाजप मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे.

सकाळी १०.५० : थोड्याच वेळात वाजपेयींचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल होणार

सकाळी १०.०० : ‘गार्ड ऑफ ऑनर’नंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे नेण्यासाठी रवाना…. लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून सरकारी निवासस्थानाहून भाजप मुख्यालयाकडे प्रवास सुरू

सकाळी ९.५५ : सर्वोच्च न्यायालय आणि नोंदणी कार्यालयाचंही कामकाजही आज अर्धा दिवस चालणार आहे… केवळ दुपारी १.०० वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील

सकाळी ९.५० : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा भाजप मुख्यालयात दाखल

सकाळी ९.४० : थोड्याच वेळात अटलजींचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे निघणार… पक्ष मुख्यालयाकडे नेण्याची तयारी पूर्ण

सकाळी ९.२० : अटलजींच्या निवासस्थानासमोर एकच गर्दी

सकाळी ९.१० :  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी दाखल

सकाळी ९.०० : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सकाळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली

सकाळी ८.३५ :  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निवासस्थानी दाखल

सकाळी ८.२० : लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख उपस्थित… लष्कराच्या तीनही प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करत माजी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली

सकाळी ८.०० : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी अटलजींच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

सकाळी ७.४० : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांनीही अटलजींना आज त्यांच्या घरी जाऊन आदरांजली अर्पण केली. वाजपेयींच्या जाण्यानं देनानं सर्वोच्च नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी दोघांनी व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत