🔴 LIVE : ‘गोविंदा रे गोपाळा’…३६ गोविंदा जखमी; १८ जणांवर उपचार सुरू

रायगड माझा ऑनलाईन टीम 

‘गोविंदा रे गोपाळा’ असे म्हणत थरारवर थर रचणारी पथके, डिजेच्या तालावर ठेका धरणारी तरुणाई अशा उत्साहवर्धक वातावरणात मुंबई आणि राज्यभरात विशेषतः मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे. मात्र, उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि पोलिसांची कारवाई, अशा परिस्थितीमुळे आज, सोमवारी साजऱ्या होणा-या दहीहंडी उत्सवात दरवर्षीपेक्षा थरांची स्पर्धा कमी झालेली पाहायला मिळत असली तरी उत्साह मात्र कमी झालेला नाही. मुंबई शहर आणि उपनगरात राजकीय हंड्यांपासून सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यातही ठाण्यातील हंड्या दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळांना आकर्षित करत आहेत. शहराचा विचार करता भायखळा, गिरगाव, वरळी, लालबाग, दादर, माहीम, प्रभादेवी, माटुंगा आणि धारावी परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंड्या गोविंदांचे लक्ष वेधून घेत आहेत.

🔴 LIVE UPDATE

  • मुंबईः दहीहंडी फोडताना ३६ गोविंदा जखमी. १८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू.
  • मुंबईः रवींद्र कांबळे (वय ३७), सचिन गायकवाड (वय ३०), वेद कुलाबकर (वय ९ ) या तीन गोविंदावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू. 
  • अहमदनगरः खासगी शाळेत दहीहंडी उत्सवादरम्यान पडून सुशांत कार्ले हा नववीतील विद्यार्थी जखमी, उपचार करून घरी सोडले.
  • दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत सहा गोविंदा जखमी. जेजे हॉस्पिटल १, केईएम ३, एमटी अग्रवाल १, एन. देसाई हॉस्पिटल १. सर्वांची प्रकृती स्थिर.

    मुंबईः कोकणनगर पथकाने सहा थर लावून फोडली दादरची हंडी. 


  • ठाणेः नौपाडा येथे शिवसाई गोविंदा पथकाची ९ थरांची सलामी. 

  • दहीहंडीः जखमी झालेल्या आकाश माळी (वय १६) मुलावर व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. प्रकृती स्थिर

  • ठाणेः दहीहंडी उत्सवादरम्यान थरावरून पडून एक जण जखमी. हॉस्पिटलमध्ये दाखल. 

  • ठाण्यात भगवती शाळेजवळ शिवसाई गोविंदा पथकाचा ९ थराचा प्रयत्न फसला.

 

दहीहंडी फोडताना ३६ गोविंदा जखमी. १८ जणांवर उपचार सुरू. जेजे १, केईएम २, नायर २, अग्रवाल २, राजावाडी २, महात्मा फुले १, व्ही. एन. देसाई १, भाभा ३, एस. के. पाटील २, पोदार २. सर्वांची प्रकृती स्थिर.

 

ठाण्यात एक गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

ठाण्यामध्ये दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात एक गोविंदा जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ठाणे : शिवतेज महिला गोविंदा पथकाचे सहा थर

 

ठाण्यात मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीमध्ये शिवतेज महिला गोविंदा पथकाने यशस्वीपणे सहा थर लावून सलामी दिली.

डोंबिवली: दहीहंडीला ‘मराठी बिग बॉस’च्या कलाकारांची उपस्थिती

 

ठाणे : भगवती शाळेच्या पटांगणात मनसेतर्फे आयोजित दहीहंडीस जल्लोषात सुरुवात

दादरमध्ये साई राम मंडळाच्या गोविंदा पथकाची ८ थरांची यशस्वी सलामी

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत