108 रुग्णवाहिका चौकात उलटली..

बारामती – पाटस रस्त्यावरील घटना

बारामती : रायगड माझा

आपघातातील जखमींना आणण्यासाठी निघालेल्या 108 रुग्णवाहिका बारामती- पाटस रस्त्यावरील रिंग रोडला समोरुन भरधाव आलेल्या दुचाकीला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भर चौकात पलटी  झाली. ही घटना आज ( गुरुवारी ) चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आज दुपारी साडे तीन वाजता उंडवडी कडेपठार हद्दीत गॅस सिलेंडरचा ट्रक उलटला होता. या आपघातात जखमीना उपचार व्हावेत. यासाठी स्थानिक लोकांनी 108 या शासकीय रुग्णवाहिकेसाठी कॉल केला होता.
त्यानुसार ही रुग्णवाहिका बारामतीकडून – उंडवडी कडेपठारकडे भोंगा वाजतवत ( सायरन )वेगात निघाली होती. बारामती शहराच्या बाहेर पाटस रस्त्याला आल्यानंतर देशमुख चौकात समोरील दुचाकीला वाचविताना रुग्णवाहिकेच्या चालकाने तातडीने ब्रेक लावला. यामध्ये रुग्णवाहिका जाग्यावर फिरली व पलटी झाली. आपघाताला कारणीभूत ठरलेला घटनेनंतर दुचाकीस्वार निघून गेला.
या आपघातात वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक डोंबाळे हे जखमी झाले.त्यांच्या हाताला मार लागला आहे.  तर चालक हेमंत खारतोडे यांना कोणतीही इजा झाली नाही.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत