पतंगाने घेतला युवकाचा बळी

 मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

पतंग पकडण्याच्या नादात छता वरून पडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीच्या आकुर्ली येथील हनुमान नगरच्या इंदुमती चाळीत घडली. अभय राजभर उर्फ गोलू (16) असे त्याचे नाव आहे. समता नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. दोन दिवसांपूर्वी वडाळा येथे राहणाया तरुणाचा मांजागळ्यात येऊन झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

अभय स्वतःच्या घराच्या छतावर चढूनपतंग उडवत होता. त्याला चाळीच्या पत्र्यावर पतंग पडल्याचे दिसले. पतंग पकडण्याच्या नादात अभय हा उडी मारून एका चाळी वरून दुसऱ्या चाळीत जात होता. तेव्हा त्याला अंदाज न आल्याने ते खाली पडला. अभय ला उपचाराकरता एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत