रोह्यात बांधकाम व्यावसायिकांचा मूक मोर्चा

रोहे : महादेव सरसंबे

रोहा तालुक्यात मागील काही वर्षांपासून रेती उपलब्ध न झाल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक नाराज असून मंगळवारी सकाळी रोहा तालुका आणि शहर बिल्डर्स असोसिएशनच्यावतीने डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृह ते तहसील कार्यालय असा मूक मोर्चा काढण्यात आला होता.

रेतीच उपलब्ध नसल्याने सध्या रोहा तालुक्यातील बांधकाम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदारांचे लक्ष्य वेधण्यासाठी रोहा तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक आणि मजुरांच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रांताधिकारी रविंद्र बोंबले व तहसिलदार सुरेश काशिद यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात तालुक्यातील रेती टंचाईवर सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मोर्चाला रोहा तालुका बिल्डर असोसिएशन अध्यक्ष रवी चाळके, शहर अध्यक्ष कौशिक शाह, बांधकाम व्यावसायिक पांडुरंग चिपळूणकर, धनवी, राम नाकती, राजु कराड, सुरेश जैन, अमित चिपळूणकर, लियाकत सवाल, दिलवार हफिज, संदिप सावंत, कामथेकर, मनोहर सुर्वे, दत्ता भगत,  तुषार शिंदे, अमित खातू, सुनील उशीरकर,  राकेश मोरे, सतेज अपणकर, सोनी हवळ, विनायक पवार, प्रविण जैन, संतोष भोर्इर, एलया, मनिष ओसवाल, अमोल चिपळूणकर, संकेत शाहा, अनंत जंगम आदींसह मजूर आणि वाहनचालक-मालक सहभागी झाले होते.

या निवेदनात सध्या रोह तालुक्यात महत्वाकांक्षी प्रकल्प आले आहेत. त्याचप्रमाणे इतर अनेक कामे सुरु आहेत. मात्र, या कामांसाठी रेतीच उपलब्ध नसल्याने सदरची कामे रखडली आहेत. आपल्या तालुक्याच्या आजूबाजूला सर्व तालुक्यांना रेती उपलब्ध आहे मात्र आपल्याकडे असूनही आपण वापर करू शकत नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायिकांमार्फत चालू असलेली बांधकामे महारेराअंतर्गत ठराविक वेळेत पुर्ण करणे शक्य होत नाही. बांधकाम चालु नसल्यामुळे बांधकाम व्यवसायीकाशी निगडीत इतर व्यवसायीक, कंत्राटदार, मजुर यांचीही कुटुंबे यावरच अवलंबून आहेत. यामुळे वादही निर्माण होत आहेत. त्यामुळे सदर रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसे १५ दिवसास न झाल्यास रोहे तालुका बिल्डर असोसिएशन, रोहा शहर बिल्डर असोसिएशन, बांधकाम कंत्राटदार मजुर यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येर्इल, असे या निवेदनात म्हटले आहे.

बातमी पहा :

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत