‘2.0’ जोरात! तीन दिवसांत १६५ कोटींचा गल्ला

मुंबई : रायगड माझा वृत्त 
Image result for 2.0 movie pics

रजनीकांत आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असलेल्या 2.0 या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत तब्बल १६५ कोटींची कमाई केली आहे. उत्तर भारत आणि इतर हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केली आहे.

हा सिनेमा गेल्या आठवड्यात गुरुवारी प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल ६४ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाची कमाई थोडी कमी झाली. बॉक्सऑफिस इंडियाच्या आकडेवारीनुसार दुसऱ्या दिवशी ४५ कोटी रुपये कमवले तर तिसऱ्या दिवशी ५६ कोटी रुपये कमाई या सिनेमाने केली. एकूण तीन दिवसांत १६५ कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे. रविवारचे आकडे अजून हातात यायचे आहेत. पण पहिल्या तीन दिवसांतया सिनेमाने खूप चांगली कमाई केली आहे. पण हा सिनेमा पहिल्या आठवड्यांत ३०० कोटींचा आकडा आोलांडेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. २.० चे बजेट ५५० कोटी असून तो बॉलिवूडचा सगळ्यात महागडा सिनेमा आहे. चेन्नई अचानक मोबाइल लोकांचे प्राण घेऊ लागतात आणि मोबाइलचा एक खूप मोठा पक्षी शहरावर घिरट्या घालू लागतो. या पक्ष्यापासून शहराला वाचवण्यासाठी वशीकरण पुन्हा चिट्टीला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. पण शहरातील काही लोकं त्याचा विरोध करतात असं या सिनेमाचं कथानक आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत