कबड्डीची लोकप्रियता गाव गल्लीपासुन दिल्ली पर्यंत : विशाल माने, प्रोकबड्डी पट्टू

महाड : मयुरी खोपकर

प्रो कबड्डी या स्पर्धामुळे कबड्डीची लोकप्रियता ही आज गावगल्ली पासुन दिल्ली पर्यंत पोहचली असल्याचे वक्तव्य प्रोकबड्डीचा प्रसिद्ध कबड्डी पट्टू विशाल माने याने ओम साईमित्रमंडळ मोहोप्रे आयोजीत कबड्डी स्पर्धा दरम्यान केले. या कबड्डी स्पर्धेत जिते गावच्या संघाने बाजी मारुन प्रथम क्रमांक पटकावला.

ओम साई मित्रमंडळ मोहोप्रे ता महाड येथे रविवार दिनांक 13 मे रोजी प्रकाश झोतातील कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रोकबड्डीचा लोकप्रिय खेळाडुविशान माने उपस्थित होता. या प्रसंगी मोहोप्रे गावचे प्रतिष्ठित नागरीक भाई आंग्रे, सरपंच जान्हवी शेडगे, भाजपाचे तालुका सरचिटणीस रविकांत वैराळे आदि मान्यवर उपस्थितहोते. या प्रसंगी आपल्याभाषणात विशाल माने याने प्रत्येक गावातुन तंत्रशुध्द कबड्डी खेळण्यात यावी व शासन स्तरावर तसे प्रयत्न झाले तर कबड्डी हा खेळ भारताला खेळातील गत वैभव प्राप्तकरुन देईल असा विश्वास त्याने या वेळीव्यक्त केला. या कबड्डी स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता. यातुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मौजे जिते या संघाने प्रथम क्रमांक मिळवुन विजेते पद पटकावले. तर ओम साई संघ मोहोप्रे यांनी द्वितीयक्रमांक पटकावला. मौजे वडघर यांनी तृतीय तर मौजे मांडले संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि चषक देण्यात आला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत