3 महिन्यासाठी उपमुख्यमंत्री पद नको; भाजपची ऑफर शिवसेनेने नाकारली!

मुंबई : रायगड माझा वृत्त

शिवसेना 3 महिन्यासाठी उपमुख्यमंत्रिपद घेणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाची भाजपकडून ऑफर दिल्याची चर्चा होती. पण त्या ऑफरला शिवसेनेकडून नकार देण्यात आली असल्याची माहिती आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याआगोदर ही ऑफर दिल्याचीही चर्चा होती.

उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून शिवसेनेला ऑफर देण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्यावर आपल्याला कोणतीही ऑफर देण्यात आली नाही अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. तर आपण फक्त 3 महिन्यासाठी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाही अशी स्पष्ट भूमिकाही शिवसेनेकडून घेण्यात आली आहे.

पुढच्या अडीच ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी आचरसंहिता लागू होईल. त्यामुळे फक्त तेवढ्याच कालावधीसाठी उपमुख्यमंत्रिपद शिवसेना स्वीकारणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तर भाजपने उपमुख्यमंत्री पदाची कोणतीही ऑफर दिली नाही अशी स्पष्ट माहितीही यावेळी देण्यात आली.

दरम्यान, जुनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यावेळीदेखील शिवसेनेतील नेत्यांना मोठी पदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या बड्या नेत्यांना नवी पदं देण्यात येणार आहेत. पण असं असलं तरी उपमुख्यमंत्री पदासाठी शिवसेना उत्सुक नसल्याची स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.

खरंतर, लोकसभा निवडणुकीत जर शिवसेनेला चांगलं यश मिळालं तर उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे दिलं जाण्याची शक्यता होती. तसं झाल्यास शिवसेनेकडून कुणाला संधी देण्यात येणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. दुसरीकडे, दिल्लीत मात्र पंतप्रधानपदासाठी हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलवली होती.

यासाठी स्वत: सोनिया गांधी यांनी सर्वांना वैयक्तीक पत्र लिहलं होतं. इतकंच नव्हे तर जे पक्ष UPA आणि NDA (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)चा भाग नाहीत त्यांना देखील सोनिया गांधी यांनी पत्र लिहलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान पार पडलं. तर निकाल 23 मे रोजी जाहीर होणार आहे.

निवडणुकीत भाजप पक्षाला बहुतम मिळणार असा अंदाज अनेक सर्व्हेतून व्यक्त केला गेला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदींना चेकमेट करण्यासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच सरकार स्थापन करण्यासाठी हलचाल सुरू केल्या होत्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत