3 महिलांना जाळणारा जलालउद्दीन खान ट्रेनमधून उडी मारून फरार

पंचवटी जाळीत कांड प्रकरणामध्ये संशयित आरोपी जलालउद्दीन खान हा पोलिसांना चकवून फरार झाला आहे.

रायगड माझा वृत्त

3 महिलांना जाळणारा जलालउद्दीन खान ट्रेनमधून उडी मारून फरार

नाशिक, 10 ऑगस्ट : पंचवटी जाळीत कांड प्रकरणामध्ये संशयित आरोपी जलालउद्दीन खान हा पोलिसांना चकवून फरार झाला आहे. आपल्या प्रेयसीच्या मुलीला आणि तिच्या तान्हा नातीला जिंवत जाळून जलालउद्दीन हा फरार झाला होता. त्याला उत्तर प्रदेशमधून पोलिसांनी अटक केली होती. पण आता हा जलालउद्दीन पोलिसांना चकवा देऊन पळाला आहे. अंधाराचा फायदा घेत चालत्या झेलम एक्सप्रेसमधून उडी मारून त्यानं पलायन केलं आहे.

उत्तर प्रदेशमधून अटक करून नाशिकला घेऊन येत असताना त्याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यात त्याला पकडण्यासाठी धावलेले सहायक निरीक्षक दीपक गिरमे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे. जलालउद्दीन खान याच्यावर तीन महिलांना जिवंत पेटून ठार मारण्याचा आरोप आहे.

संगीता या महिलेचं जलालउद्दीन खान बरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांच्यात मोठा वाद झाला. यानंतरचा राग अनावर न झाल्याने रागाच्या भरात जलालउद्दीन याने त्याची प्रेयसी, तिची मुलगी आणि तिच्या नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 10 महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर चिमुकलीची आई म्हणजेच प्रिती शेंडगे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा नाशिक पोलीस जलालउद्दीन खानच्या शोधात आहेत. सगळ्या संभाव्य ठिकाणी ते त्याचा शोध घेत आहेत. पण जलालउद्दीनच्या काही क्षणाच्या क्रोधामुळे एका आई आणि मुलीचा त्याने जीव घेतला आहे. त्यामुळे पोलीस जलालउद्दीनला लवकर ताब्यात घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील अशी शेंडगे कुटुंबियांची इच्छा आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत