30 तासांपासून शिवसैनिकांचे कोरड्या विहिरीत बसून आंदोलन

बीड : रायगड माझा ऑनलाईन 

दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवल्या जात नसल्याचा निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील कोटेवाडीमध्ये शिवसैनिकांनी भाजप सरकारविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. हे शिवसैनिक कोरड्या विहिरीमध्ये आंदोलनाला बसले असून गेल्या 30 तासांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. सध्या मराठवाड्यामध्ये कडाक्याची थंडी पडली असून या थंडीमध्येही आंदोलकांनी त्यांचं आंदोलन सुरू ठेवलं आहे. हे आंदोलन संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी चर्चेचा विषय बनलं असून या शिवसैनिकांना पाहण्यासाठी या विहिरीभोवती मोठी गर्दी होऊ लागली आहे.

दुष्काळ जाहीर करून एक महिना उलटला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ही म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये दुष्काळ सहन करण्याची ताकद आता उरली नाही त्यामुळे दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवा या मागणीसाठी सोमवारी भल्या पहाटे बीडमधील शिवसैनिकांनी दुर्गम भागातील 60 फूट  कोरड्या विहिरीत उतरत आंदोलनाला सुरुवात केली.  प्रशासनाकडून शिवसैनिकांना अजूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे आंदोलन गेल्या 30 तासांपासून अजूनही सुरू आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत