40 प्रवाशांना घेऊन जाणारी नौका गोदावरीत बुडाली, 15 जण बेपत्ता; बचाव मोहिम युद्ध पातळीवर

हैदराबाद : रायगड माझा

आंध्र प्रदेशात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी नौका गोदावरी नदीत बुडाली आहे. या दुर्घटनेत किमान 15 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. नौकेत प्रवास करणारे बहुतांश लोक विद्यार्थी होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ही नौका नदीतील एका पुलाच्या पिल्लरला धकडली होती. त्यानंतरच हा अपघात घडला आहे. दरम्यान, हरवलेल्या नागरिकांना शोधण्याचे आणि जखमींना रुग्णालयात हालवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी…

स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, पूर्व गोदावरी जिल्ह्यात ही नौका शनिवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास विद्यार्थांना घेऊन येत होती. त्यामध्ये 40 जण प्रवास करत होते. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या एका ब्रिजच्या पिलरला ही नौका आदळली.

राज्य, केंद्राचे आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात
आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकांनी संयुक्तरित्या बचाव कार्याला सुरुवात केली आहे. यात 40 पैकी 10 जणांना बाहेर काढण्यात आले असे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. बचाव मोहिमेसाठी दोन्ही पथकांनी 35-35 सदस्यांच्या दोन टीम तयार केल्या आहेत. सोबतच मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित विभागांना वेळीच कारवाईचे आदेश दिले आहेत. याच जिल्ह्यात गतवर्षी मे महिन्यात 40 प्रवाशांना घेऊन येणारी नौका बुडाली होती. त्यामध्ये 20 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत