उत्तर प्रदेशात भीषण अपघात, 17 जणांचा जागीच मृत्यू

मैनपुरी (उत्तरप्रदेश) : रायगड माझा

उत्तरप्रदेशात एक खासगी बस दुभाजकाला धडकडून झालेल्‍या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३५ जण जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी तात्‍काळ जवळच्या रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्‍यामुळे बस  डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की  यात १७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, बसमधील इतर ३५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. पोलिस घटनास्‍थळी पोहचले असून, मदत कार्य सुरु आहे.

उत्‍तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींवर योग्य उपचारांसाठीही रुग्णालयाला त्‍यांनी निर्देश दिले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत