50 लाख दे नायतर… खंडणी मागणाऱ्या भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा

पुणे : रायगड माझा वृत्त

भाजपा आमदाराने एका केबल कंपनीकडे चक्क 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपा आमदार योगेश टिळेकर, त्यांचा भाऊ चेतन टिळेकर व गणेश कामठे यांच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार योगेश टिळेकर हे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्षही आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर विकास आराखड्यातील आरक्षण बदलून बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करुन देण्यासाठी 1 कोटी रुपयांची मर्सिडीज गाडी लाच स्विकारल्याचा आरोप झाला होता. मात्र, यावेळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात रवींद लक्ष्मण बऱ्हाटे यांनी फिर्याद दिल्यानंतर भादंविच्या कलम 385, 369, 427, 34 अन्वये तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बऱ्हाटे हे एरंडवणे भागातील ई-व्हिजन टेली इन्फ्रा कंपनीत व्यवस्थापक आहेत. या कंपनीकडून विविध माहिती तंत्रज्ञानाच्या सेवा पुरविल्या जातात. सध्या कात्रज-कोंढवा या भागात कंपनीचे केबलचे काम चालू आहे. मात्र, आमदार टिळेकरांसह इतर दोघांनी हे काम थांबविण्यास सांगतिले. तर टिळेकरांनी फोन करुन, समक्ष भेटून त्यांच्या मतदारसंघात काम करण्यास पैशांची मागणी केली. काम सुरू ठेवायचे असल्यास 50 लाख द्यावे लागतील, अशी धमकीच बऱ्हाटे यांनी दिली.
BJP MLA threaten the bussinesman, 50 lakhs of non-stop jobs ... | 50 लाख दे नायतर... खंडणी मागणाऱ्या भाजपा आमदाराविरुद्ध गुन्हा

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत