पेट्रोल, डिझेलची दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूलबस, खासगी वाहतूकदार संपावर, विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई : रायगड माझा वृत्त 

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आज देशभरात एकदिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शाळांची विद्यार्थी वाहतूक आज बंद राहणार आहे.
स्कूलबस, खासगी वाहतूकदार संपावर, विद्यार्थ्यांचे हाल
या संपात सर्व खासगी वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बससह खासगी कॅब, ट्रक, टेम्पो ही वाहनंसुद्धा सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, आरटीओऐवजी वार्षिक वाहन तपासणी स्कूल बस सेफ्टी समितीनं करावी, शाळेभोवती पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी खासगी वाहतूकदारांनी ही एकदिवसीय बंदची हाक दिली आहे.
संपात देशभरातील 95 लाख ट्रकचालक सहभागी
ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने टोलवसुली कार्यप्रणालीवर बोट ठेवलं आहे. आम्ही टोलविरोधात नाही तर टोलवसुलीतील भोंगळ कारभाराविरोधात आहोत. असं असोसिएशनने म्हटलं आहे. तसंच आजच्या संपात देशभरातील 95 लाख ट्रकचालक सहभागी होतील असा दावाही त्यांनी केला आहे.
संपात सहभागी होणारी वाहने : 
स्कूल बस, लक्झरी बस, ट्रक, टेम्पो, खासगी कॅब, टुरिस्ट कार इत्यादी वाहनं ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या या संपात सहभागी असतील.
स्कूलबसचालकांच्या मागण्या :
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअंतर्गत आणाव्यात, जेणेकरुन किंमती कमी होतील.
  • इंधनांचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत.
  • स्कूल बसच्या चेसिसची एक्साईज ड्युटी माफ करावी.
  • मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर स्कूल बसना टोलमाफी द्यावी.
  • महाराष्ट्रातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा.
  • विमा हफ्त्यात कपात करावी.
  • आरटीओकडून होणारी वार्षिक तपासणी बंद करावी आणि बस स्कूल बस सेफ्ट कमिटीकडून तपासणी करावी.
  • शाळेभोवती पार्किंगसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.
  • रस्ते खड्डेमुक्त करावे.

ट्रक चालकांच्या मध्यरात्रीपासून सुरु होत असलेल्या देशव्यापी बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या वाहनातून संप संपेपर्यंत मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी करत हा निर्णय घेतला आहे.
ट्रक चालकांच्या मागण्या :
डिझेल दरवाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवणे आणि त्यात बदल तिमाही असावाटोलमुक्त भारत संकल्पना राबवावी.थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवणेआरटीओ, पोलीस आणि सीटीओ यांच्याकडून महामार्गावर होणारी छळवणूक थांबवावी
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत