जम्मू- काश्मीरमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; 12 जणांचा मृत्यू

काश्मीर : रायगड माझा ऑनलाईन 

जम्मू- काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात मचैल देवीच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बसवर काळाने घाला घातला. किश्तवाड-पद्दार रोडवर भूस्खलन झाल्याने भाविकांची बस दरीत कोसळली असून, यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

12 पैकी 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या पाच वर्षीय मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 25 जुलै रोजी मचैल देवीच्या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा एकूण 43 दिवस चालते. या यात्रेत आत्तापर्यंत दीड लाख भाविक येऊन गेले आहेत. मात्र, देवीच्या मंदिराकडे जाणारा मार्ग हा धोकादायक मानला जातो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत