केरळच्या महापुरावर चिमुकल्याने दिली भावनिक प्रतिक्रिया

मुंबई : रायगड माझा वृत्त

नाण्याला जशा दोन बाजू असतात अगदी तशाच सोशल मीडियाला देखील दोन बाजू असतात. एक चांगली आणि एक वाईट. सोशल मीडियावरची कधी कोणती गोष्ट आवडेल आणि ती सोशल मीडियावर व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. 

आपल्याला माहितच आहे, केरळमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. महाप्रलयाच्या या परिस्थितीमध्ये अनेकजण बेघर झाले. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. देवाची भूमी म्हणजे ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये देवाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. केरळच्या या परिस्थितीने प्रत्येकजण चिंतेत आहे. प्रत्येकजण आपापल्या परिने काहीना काही मदतीचा हात पुढे करत आहेत. असं असताना केरळची ही पूरस्थिती एका मुलाने आपल्या बाबांसोबत टीव्हीवर पाहिली. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या मुलाची प्रतिक्रिया बघून तुम्ही देखील चक्रावून जाल. हा व्हिडिओ त्या लहान मुलाचा आहे.

या व्हिडिओत तो लहान मुलगा आपल्या बाबांना विचारतो की, कुठे चाललेत ते. आपण एक काम करूया, आपण त्यांना आपल्या घरी बोलवूया. बोबडे बोल बोलत असताना त्या चिमुकल्याच्या डोळ्यात पाणी आहे. त्या केरळची पूरस्थिती बघून तो खूप भावूक झाला आहे. आपण म्हणतो की, आज माणसातील माणुसकी राहिली नाही. पण तुम्ही पाहू शकता हा मुलगा किती भावूक झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत