जेएनयूएसयू निवडणूक २०१८ : यूनाइटेड लेफ्टने जिंकल्या सर्व जागा, साई बालाजी अध्यक्षपदी

 

रायगड माझा वृत्त 

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनयूएसयू) निवडणूकीमध्ये यूनाइटेड लेफ्टने मोठा विजय मिळविला आहे. यूनाइटेड लेफ्टच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत चारही जागेवर विजय संपादन केला आहे.

यूनाइटेड लेफ्टचा के.एन. साई बालाजी हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी ठरला आहे. तर उपाध्यपदी सारिका चौधरी, महासचिवपदी एजाज अहमद राथेर आणि संयुक्त सचिवपदी अमुथा जयदीप या यूनाइटेड लेफ्टच्या उमेदवारांनी विजय संपादित केला आहे.

निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दुसऱ्या क्रमांकावर तर बिरसा फुले आंबेडकर स्टुडेंट असोसिएशन तिसऱ्या स्थानावर राहिली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत