धावत्या रेल्वेत आढळलेल्या सापाला एका धाडसी व्यक्तीने नुसत्या हाताने मारले. इंडोनेशियामध्ये नुकतीच ही घटना घडली असून ही व्यक्ती इंटरनेटवर प्रसिद्ध झाली आहे.

दक्षिणेतील बोगोर या शहरातून ही रेल्वे जकार्ताच्या दिशेने जात होती. त्यावेळी एका प्रवाशाच्या सामानावर हा साप वळवताना आढळला. तेव्हा ही गाडी रस्त्यातच थांबविण्यात आली.

त्यानंतर चष्मा घातलेल्या या व्यक्तीने सहजतेने सापाची शेपूट धरली आणि जोरजोरात त्याचे डोके खाली आपटले. त्यावेळी डब्यातील प्रवासी थक्क होवून सारा प्रकार पाहात होते. त्यात हातात दंडुका धरलेल्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश होता, हे विशेष.

या सापाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तो मृत साप दाराबाहेर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांकडे भिरकावला. त्याचे हे संपूर्ण कृत्य सहप्रवाश्यांनी चित्रीत केले. ही चित्रफित आता व्हायरल झाली आहे. मात्र या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही. हा साप विषारी होता का बिनविषारी, हे समजू शकलेले नाही.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल केसीआय या रेल्वे कंपनीने माफी मागितली आहे. “आम्ही दिलगीर आहोत आणि या प्रकारामुळे गैरसोय झालेल्या प्रवाशांची आम्ही क्षमा मागतो,” असे कंपनीच्या प्रवक्त्या इव्हा चेअरुन्निसा म्हणाल्या.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत