96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

जालना :रायगड माझा 

दहावीत 96 टक्के घेणाऱ्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सायली जोशी असं या 17 वर्षींय मुलीचे नाव आहे.

खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या सायलीने आत्महत्या केलीय, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय. या संदर्भातले काही पुरावे तिच्या पुस्तकांमध्ये सापडल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

तुम्ही प्रत्येक वेळी मला साथ देता, मात्र मीच कुठेतरी कमी पडते, मला या वेळी कमी मार्क्स मिळाले आहे, म्हणून मी आत्महत्या करत आहे, असं तिनं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. मात्र तिच्या पालकांनी शिक्षकाच्या त्रसाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा केलाय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत