मुंबईच्या डान्सबारवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : रायगड माझा वृत्त 

मुंबई पोलिसांचे दबंग अधिकारी शिवदीप लांडे यांनी पुन्हा एकदा त्यांचा इंगा दाखवला आहे. मुंबईच्या अनेक अवैधरित्या सुरू असलेल्या डान्स बारवर शिवदीप यांनी पुन्हा छापे मारण्यास सुरूवात केली आहे. अशाच एका छाप्यामध्ये मुंबई पोलिसांनी तब्बल 7 मुलींना रेस्क्यू केलं आहे.

ग्रँड रोडच्या संदीप पॅलेसमध्ये हा छापा टाकण्यात आला. पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहताच बारमध्ये मोठा कल्ला झाला. ग्राहकांची पळापळ सुरू झाली,  पण सगळ्या बाजूने घेरत पोलिसांनी यात धाडीत 12 ग्राहक, 1 कॅशियर , 1 मॅनेजरला आणि 5 वेटरला ताब्यात घेतलं आहे.

हा छाप्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे डान्स बारमध्ये काम करणाऱ्या काही मुलींना बारमधल्या रुममध्ये लपवण्यात आलं होतं. या मुलींना सुरक्षितरित्या पोलिसांनी मुक्त केलं आहे.

दरम्यान, या 7 मुली कुठून आणि कशा आणण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या मॅनजरकडून याबद्दल आणि काही खूलास करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहे. याचा आणखी कोणत्या बारशी संबंध आहे का याचाही पोलीस तपास घेत आहे.

मुंबई पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात काही 46,400 रुपयांची नगदही जप्त करण्यात आली आहे. या सगळ्या गंभीर प्रकारात आणखी कोणाचा हात आहे का, याचाही पोलीस तपास घेत आहे. शिवदीप यांच्या या धडक कारवाईमुळे मुंबईतील अनेक प्रसिद्ध डान्स बारचे ढाबे दणाणले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत