ABP माझाच्या नम्रता वागळे यांना आचार्य अत्रे पुरस्काराने सन्मानित, रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन दिमाखात साजरा

महाड : रायगड माझा वृत्त 

रायगड प्रेस क्लबचा चौदावा वर्धापन दिन सोहळा महाड मध्ये दिमाखात साजरा झाला. जेष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात हा सोहळा पार पडला.  

रायगड मधील पत्रकारांची सवयंसेवी संस्था असा लौकिक असलेल्या रायगड प्रेस क्लबचा चौदावा वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रात आणि सामजिक क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. ABP माझाच्या वृत्त निवेदक नम्रता वागळे यांचा आचार्य अत्रे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पत्रकारांच्या हक्कासाठी लढा उभारणारे एस. एम. देशमुख यांनाही यावेळी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवतेजचे विजयसिंह जाधव याना रायगड प्रेस क्लबचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माथेरान येथील दिनेश सुतार आणि  खोपोलीचे  अनिल पाटील यांचा युवा पत्रकार पुरस्काराने तर मानसी चेऊलकर यांचा सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पनवेल येथील सामानाचे प्रतिनिधी संजय कदम आणि तळा येथील कृष्णा भोसले यांचा श्रमिक पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारांसह महाड तालुक्यातील गुणवंत व्यक्तींचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला आज तकचे साहिल जोशी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्यासह विविध स्तरावरील पत्रकार उपस्थित होते. यावेळी रायगड प्रेस क्लबचे मावळते अध्यक्ष विजय मोकल यांनी अनिल भोळे यांच्याकडे  रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्ष पदाची धुरा सुपूर्द केली. मनोज खांबे, आप्पा बाळ आणि प्रवीण कुलकर्णी यांच्यासह महाडच्या पत्रकारांनी या सोहळ्याच्या आयोजनात विशेष पुढाकार घेतला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत