Apple TV Plus भारतात लाँच…

नवी दिल्ली : महाराष्ट्र News 24 वृत्त 

आता भारतात Apple TV Plus सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. कंपनीकडून सुरुवातीला सात दिवस मोफत ट्रायल दिली जात आहे. ग्राहकांना सेवा आवडल्यास सात दिवसानंतर प्रति महिना ९९ रुपये या दराने सबस्क्रिप्शन घेता येईल. ही Apple ची एक व्हिडीओ स्ट्रिमिंग सेवा आहे.

यावर्षी मार्च महिन्यातच Apple ने या सेवेची घोषणा केली होती. तर सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियात झालेल्या Apple इव्हेंटमध्ये कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी रिलीज तारीख आणि किंमत सांगितली होती. Apple TV Plus ही सेवा जगातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. काही वृत्तांनुसार, Apple टीव्ही प्लस ४० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध असेल. यातील कार्यक्रम डब किंवा टायटलसह दाखवले जातील. ही सेवा आयफोन, आयपॅड, Apple टीव्ही, आयपॉड टच, मॅकवरही उपलब्ध आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत