Asus ZenFone Max Pro M2 चा पहिला सेल आज

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

Image result for आसुस झेन फोन मॅक्स प्रो एम२

आसूस झेन फोन मॅक्स प्रो एम२ आज पहिल्यादा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आसुसच्या या फोनची विक्री एक्सक्लुसिवरित्या फ्लिपकार्टवर होणार आहे. आसुस झेन फोन मॅक्स प्रो एम१ च्या अपग्रेडेड व्हर्जनची खासियत म्हणजे यात असलेला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि ५ हजार एमएएचची बॅटरी आहे. आसुसचा हा फोन याच महिन्यात भारतात लाँच करण्यात आला आहे आणि त्यासोबतच अनेक ऑफर्सही दिल्या आहेत.

आसुस झेन फोन मॅक्स प्रो एम२: किंमत व लाँच ऑफर्स

झेनफोन मॅक्स प्रो एम२ च्या ३ जीबी स्टोरेजची किंमत १२,९९९ रुपये आहे. ४ जीबी रॅम/ ६४ जीबी स्टोरेज फोनची किंमत १४,९९९ रुपये तर ६ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज फोन १६,९९९ रुपयांना मिळणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. हा फोन निळ्या आणि टायटानियम रंगात उपलब्ध आहे.

लाँच ऑफर्स अंतर्गत एचडीएफसी बँक क्रेडिट व डेबिट कार्डवर खरेदी केल्यावर १ हजार रुपये सूट, अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिल्यास ५ टक्के सूट व नो कॉस्ट ईएमआयसारख्या ऑफर्सही आहेत. याशिवाय १२९९ रुपयांचा फ्लिपकार्टचा संपूर्ण मोबाईल प्रोटेक्शन प्रोग्राम ९९ रुपयांत विकत घेता येईल.

आसुस झेनफोन मॅक्स प्रो एम२ ची वैशिष्ट्ये:

>> ६.२ इंच का फुल एचडी+ डिस्प्ले
>> आस्पेक्ट रेशो १९:९
>> सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास
>> अँड्रॉइड तंत्रज्ञानावर आधारित
>> ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६०SoC प्रोसेसर
>> ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज
>> मायक्रो एसडी कार्ड वापरून २ टीबी पर्यंत वाढविण्याची क्षमता
>> फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सलचा ड्युल कॅमेरा सेटअप
>> सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा
>> फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर
>> ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी
>> कनेक्टिविटी साठी ४जी वीओएलटीई, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ५.०, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो, हेडफोन जैक आणि माइक्रो-यूएसबी पोर्ट
>>फोन स्क्रॅच आणि ड्रॉप रेसिस्टंस असल्याचा आसूसचा दावा
>> एक्सिलेरोमीटर, एम्बियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत