BREAKING :शिवस्मारक जागेची पहाणी करायला गेलेली बोट बुडाली

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for shivaji maharaj smarak

अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडलीये. या बोटीत ५० जण होते. सुदैवाने त्याठिकाणी दुसरी बोट पोहोचल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मरिन ड्राईव्ह किनाऱ्यापासून समुद्रातील काही अंतरावर असलेल्या खडकावर शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. आज या स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आज सकाळी गेट वे आॅफ इंडियाहुन शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यासह इतर मान्यवर आणि ४० पत्रकार स्पीड बोटीतून रवाना झाले होते.मात्र, समुद्रात असलेल्या खडकाचा अंदाज न आल्यामुळे एक बोट धडकली.सुमारे 40 पत्रकारांना घेऊन निघालेली बोट गेले दोन तास समुद्रात फिरत होती. यामध्ये अनेक मोठे अधिकारी होते. ही बोट बुडाली आहे. पण सर्व जण सुरक्षित आहेत. किनाऱ्यापासून 3 किलोमीटर 600 मीटर अंतरावर ही घटना घडलीये.

BREAKING : शिवस्मारक जागेची पाहणी करायला गेलेली बोट बुडाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात इंजिन नादुरुस्त होऊन बोट बुडत असताना त्या बोटीतून प्रवास करणाऱ्यांना वाचविण्यात पोलिसांना यश आलं. दुसरी बोट लगेच घटनास्थळी पाठवून पोलिसांनी बुडणाऱ्या बोटीतील प्रवाशांची सुटका केली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, गेट वे आॅफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह समुद्रातील परिसरात खडक पसरलेला आहे. शिवस्मारकासाठी निवडलेली जागा ही योग्य नाही. निवडणुकीच्या तोंडावर शिवस्मारक उभारण्याचं विनायक मेटे यांनी नौटंकी सुरू आहे संतप्त प्रतिक्रिया दामोदर तांडेल यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत