CAA आणि NRC साठी भाजपाची समर्थन रॅली

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

देशात आणि राज्यात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व संशाेधन विधेयका वरून रणकंदन माजले असताना भाजपने नागपूर आणि मुंबई मध्ये  याच्या समर्थनार्थ समर्थन रॅली काढली . नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत संमत झाल्यानंतर त्याला देशभरातून विराेध हाेताना दिसत आहे. देशातील विविध भागांमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरुन या कायद्याचा निषेध करत आहेत.

दिल्लीतील जामिया मिलीया विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर या आंदाेलनाची व्याप्ती वाढली. देशभरातील विविध विद्यपीठांमध्ये तसेच रस्त्यावर या कायद्याचा निषेध करण्यात येत आहे. दाेन्ही कायद्यांना विराेध करणारे फलक यावेळी हातात धरण्यात आले हाेते. या आंदाेलनात तरुणांची संख्या सर्वाधिक हाेती. अशातच  भाजपाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर मध्ये तर खासदार मनोज कोटक आणि आमदार पराग शाह यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मध्ये समर्थन रॅली काढली. हे  दाेन्ही कायदे देशात दुफळी निर्माण करण्याचे काम करीत आहेत. हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने देशाला विभागने याेग्य नाही. असेच पुढे चालू राहिले तर हे लाेक जातीच्या आधारे देशाचे विभाजन करतील अशी या कायद्याच्या विरोधकांची भावना आहे  तर देश हितासाठी अशा कायद्यांची आवश्यकता असल्याचे भाजपचे मत आहे. त्यामुळे या कायद्याच्या समर्थनार्थ  भाजपा देखील रस्त्यावर उतरल्याने  महाराष्ट्रात पुढील काळात  या वरून रस्त्यावर  संघर्ष होऊ शकतो .
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत