CAA : भाजपने शेअर केला डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडिओ

महाराष्ट्र News 24 वृत्त

नागरिकत्व कायद्याला विरोध करत देशभर आंदोलन होत आहे. या आंदोलनात काँग्रेससह इतर अनेक पक्ष सहभागी आहेत. यातच आता काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. मनमोहन सिंग यांनी 2003 मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडिओ तासाभरता व्हायरल झाला आहे. 

यामध्ये मनमोहन सिंग बांगलादेशात धार्मिकतेवरून हिंसाचाराचे बळी ठरलेल्या शरणार्थींसाठी सरकारने सहानुभीतीची भूमिका घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.त 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार होते. त्यावेली राज्यसभा सदस्य असलेले मनमोहनसिंग यांनी तत्कालिन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलाताना भाषण केलं होतं.
धार्मिक आधारावर शरणार्थींना नागरिकत्व दिल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. इतर पक्ष नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत आहेत. अशा परिस्थितीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हा व्हिडिओ भाजपने समोर आणला आहे.आता मनमोहन सिंग यांच्या या व्हिडिओवरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात पुन्हा खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत