#CycloneTauktae : सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू : राणे

तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली, तर काही घरांचंही नुकसान झालं आहे.

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं आहे

दरम्यान,भाजप नेते नितेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. सिंधदुर्गात वादळामुळे खुप नुकसान झाले आहे.. घर,गोठे,बागा,मछिमारांचे पण खुप नुकसान झाले आहे असे समजते.. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत..कुठे कुठे नुकसान झाले आहे याचीही माहिती घेत आहोत.. सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देतो! असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तोक्ते चक्रीवादळानं आज सकाळी साडेआठच्या सुमारास अनपेक्षितपणे रौद्र रूप धारण केलं असून ते आता मुंबईलगतच्या समुद्रात दाखल झालं आहे. वादळ सध्या मंबईच्या किनाऱ्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून ते स्वतःभोवती ताशी 180 ते 190 किलोमीटरच्या गतीनं घोंगावतं आहे. या वादळाची पुढे सरकण्याची गतीही आणखी वाढून ताशी 20 किलोमीटर झाली आहे.

आता गती वाढल्यामुळे तोक्ते वादळ आज रात्रीच पोरबंदर आणि महुआ दरम्यान गुजरातचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. वादळाच्या प्रभावामुळे मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटेपासून वादळी वाऱ्यासह सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही सुरू असून आता पालघर मध्येही वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत