Dancing Uncle च्या मेहुण्यावर जीवघेणा हल्ला, यांच्याच लग्नात झाले होते Viral

 

रायगड माझा वृत्त

ग्वाल्हेर – लग्नात गोविंदाच्या गाण्यावर डान्स करून व्हायरल झालेले डब्बू उर्फ संजीव श्रीवास्तव यांच्या मेहुण्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डांसिग अंकल नावानेही ओळखल्या जाणारे डब्बू याच मेहुण्याच्या लग्नात डान्स करून व्हायरल झाले होते. त्यांच्या जखमी मेहुण्याचे नाव कुशाग्र श्रीवास्तव आहे. ही घटना ग्लाल्हेरच्या जनकगंज परिसरात घडली असून पोलिस सविस्तर तपास करत आहेत.

घरावर पडला होता दरोडा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुशाग्र यांच्या राहत्या घरात घडली आहे. कुशाग्र यांच्या घरात अचानक चोरटे घुसले होते. त्यांनी या चोरांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्वाल्हेरच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कुशाग्र यांचा विवाह 12 मे रोजी झाला होता. त्यांच्याच लग्नात त्यांचे भाऊजी डब्बू उर्फ संजीव श्रीवास्तव यांनी डान्स केला होता.

कोण आहेत डान्सिंग अंकल?
मध्यप्रदेशच्या विदीशा जिल्ह्यात राहणारे संजीव श्रीवास्तव (46) भोपाळच्या भाभा विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 12 मे रोजी आपला मेहुणा कुशाग्रच्या लग्नात त्यांनी स्टेजवर डान्स केला होता. गोविंदाच्या गाण्यावर केलेला हा डान्स देशभर व्हायरल झाला. तेव्हापासून ते डान्सिंग जीजा आणि डान्सिंग अंकल म्हणून प्रसिद्ध झाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत