don’t take it seriously……प्रफुल पटेल यांनी काल केलेले पंतप्रधान पदाबाबतचे विधान फार गांभिर्याने घेऊ नका असे शरद पवार यांनी आज चिंतन शिबिराच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . आपला पक्ष ,पण लढवीत असलेल्या जागा या यशाची टक्केवारी लक्षात घेता हे शक्य नसल्याचा वास्तववादी विचार त्यांनी मांडला . या कडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी आपला पक्ष बळकट करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन करताना त्यांनी यशाचा मंत्र देखील उलगडून सांगितला .
-शरद पवार यांच्या भाषणाचे मुख्य मुद्दे …..
-चुकीच्या अर्थकारणामुळे लोकांची क्रयशक्ती संपुष्टात
-निर्याती वर परिणाम
-शेती व्यवसाय संकटात यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले
-कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ
-सरकारकडून फसव्या जाहिराती
-फसव्या जाहिरातीतील नागरिकांना घेऊन आम्ही लाभार्थी ऐवजी आम्ही अपमानित अशी मोहीम राबविणार
-नवीन रोजगार निर्मिती करण्यात सरकारला अपयश
-आहे तो रोजगार राहिला नसल्याने बेरोजगारी मध्ये वाढ
-याला शिवरायांचा महाराष्ट्र कसा म्हणावा ,जिथे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.
-स्वतःच्या पक्षीय प्रचारासाठी हे सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करीत आहे .
-समाज माध्यमातुन सरकार विरोधी सूर काढणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करून राज्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटाळा जात आहे .
यशाचा मंत्र
-वकील डॉक्टर शेतकरी, सामान्य नागरिक , व्यापारी , गावागावात आठवडा बाजारातून व्यापार करणारे छोटे व्यावसायिक ,कलाकार अशा सर्वच स्तरातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली .
-बदलत्या काळाची गरज ओळखून कायद्याच्या चौकटीत राहून समाज माध्यमाचा प्रभावी वापर करण्याची पदाधिकाऱ्यांना सूचना
पत्रकार परिषतेतील महत्वाचे मुद्दे
-उद्धव ठाकरे आणि संजय राऊत भेटायला आले होते होते , सरकारमध्ये ते फार समाधानी आहेत असे वाटले नाही पण सरकार मधून बाहेर पडण्या बाबतचे काहीही ते बोलले नाहीत .
-राहुल गांधीच नव्हे तर कोणत्याही पक्षाचे नेतृत्व जर सक्षम होत असेल तर त्याचे स्वागत केले जाते .
-राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कम करण्याचा प्रश्नच येत नाही , जेंव्हा आघाडी होते ती समान कार्यक्रमाच्या आधारे होते . तिथे नेतृत्वाचा प्रश्न नसतो .
-गुजरात मध्ये काँग्रेस सोबत जाण्याबाबत चर्चा सुरु आहे .
-मराठा आरक्षणा मागे शरद पवार असल्याची जशी चर्चा आहे तशी लातूरच्या भूकंपामागे शरद पवार असल्याचीही चर्चा होती.