Ganesh Utsav 2018 : कोणीतरी कतरिनाला आरती करायला शिकवा, नेटकऱ्यांची विनवणी

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह आणि कल्ला. बाप्पा विराजमान झाल्यानंतर त्यांच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता राहू नये हाच अनेकांचा अट्टहास असतो. पण, कसं असतं ना, बाप्पाचरणी आपली सेवा अर्पण करतेवेळी अनेकांकडून चुका होतात. अशीच चूक अभिनेत्री कतरिना कैफ हिच्याकडून झाली असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अभिनेता सलमान खानची बहिण, अर्पिता खान शर्मा हिच्या घरी बाप्पा विराजमान झाले. ज्यानंतर त्यांच्या दर्शनासाठी संपूर्ण खान कुटुंबासह इतरही सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ज्यामध्ये खुद्द सलमान खान पासून, त्याची जवळची मैत्रीण कतरिना कैफ हिचाही समावेश होता. अर्पिताच्या घरी कतरिना आल्याची चर्चा झालीच. पण, त्यासोबतच तिच्यावर नेटकरी नाराजही झाले. त्यामागचं कारण होतं ते म्हणे बाप्पांची आरती. गणपतीची आरती करताना यात खान कुटुंबीय सहभागी झालेच. त्यासोबतच कतरिनानेही बाप्पांची आरती केली. पण, आरतीचं ताट सरळ दिशेने (उजवीकडून डावीकडे) फिरवण्याऐवजी कतरिनाने ते उलट्या दिशेने फिरवलं.


हाच मुद्दा पकडून मग या आरतीच्या व्हिडिओवर अनेकांनीच कमेंट करत कोणीतरी कतरिनाला आरती कशी करतात हे शिकवा, अरे ती आरली उलट्या दिशेने फिरवत आहे असं म्हणत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिची खिल्लीही उडवली. आरती करतेवेळी होणाऱ्या चुका, वापरले जाणारे शब्द आणि त्यातून होणारे शाब्दिक विनोद या गोष्टी म्हणजेही उत्सवाचा एक भागच. पण, कतरिनाकडून निदान आरतीचं ताट उलट्या दिशेने फिरवलं जाणं अपेक्षित नसल्याचच अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं असल्याचं पाहायला मिळालं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत