KBC ला मिळणार नवा करोडपती…?

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

सोमवारी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बिहारचे अजित कुमार बसले होते. अजित एक जेल अधिक्षक आहेत. पण ते या एपिसोडमध्ये खूपच चतुराईनं खेळताना दिसले. यासोबतच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी सुद्धा खूप गप्पा मारल्या. अजित कुमार आता 1 कोटीच्या प्रश्नासाठी खेळताना दिसणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन अजित यांना 1 कोटी रुपयांसाठींचा प्रश्न विचारताना दिसत आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात अमिताभ बच्चन 50 लाखानंतर अजित यांना 1 कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अखेर स्पर्धक या प्रश्नासाठी लाइफलाइन घेतो या ठिकणी येऊन संपतो. या ठिकाणी अजित 50-50 या लाइफलाइनचा वापर करताना दिसतात. पण ते 1 कोटी जिंकले की नाही याबाबत मात्र या प्रोमोमध्ये कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याविषयीची उत्सुकता अद्याप कायम आहे सोमवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं की अजित यांनी त्यांच्या वेगवेगळ्या जेलमधील अनुभवांबद्दल अमिताभ बच्चन यांना सांगितलं. त्यांनी नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागात भ्रमण केलं आणि त्यातून त्यांना कळलं की अनेक अपराधी त्यांच्या परिस्थितीमुळे अपराध करतात, असे अजित यांनी सांगितले

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत