LIVE : पालघर: 20 फेऱ्यांमध्ये भाजपची आघाडी कायम

भाजपकडे 26 हजार 476 मतांची आघाडी

पालघर : रायगड माझा वृत्त 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासून दुपारी 12 पर्यंत झालेल्या 14 फेऱ्य़ांमध्ये भाजपचे राजेंद्र गावित यांनी जवळपास 20 हजारांची आघाडी मिळवली. तर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा ही सुरुवातीला तिसऱ्या स्थानावर होते, नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अजून बऱ्याच फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे.

पालघरमध्ये 28 मे रोजी लोकसभेसाठी पोटनिवडणूक झाली होती. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत.

12.40 PM पालघर: विसावी फेरी – भाजपकडे 26 हजार 476 मतांची आघाडी
राजेंद्र गावित (भाजप) – 263683,श्रीनिवास वनगा (शिवसेना) – 237207,बळीराम जाधव (बविआ) – 208009,दामोदर शिंगडा (काँग्रेस) – 46861, किरण गहाला (माकपा) – 71686

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत