Live मराठा आंदोलन : कर्जत-कल्याण आणि कर्जत मुरबाड राज्यमार्ग आंदोलकांनी रोखून धरला

रायगड  माझा ऑनलाईन टीम । LIVE 

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवांसह शाळा-महाविद्यालये आणि स्कूलबस, दूध- भाजीपाला वगळण्यात आले असून बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्यात आले होते. मात्र, सकाळी ठाण्यातील वागळे इस्टेट येथे आंदोलकांनी टीएमटीच्या बसची तोडफोड केली.

मराठा समाजास आरक्षण द्यावे तसेच आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांवरील नोकरभरती स्थगित करावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. सोमवारी काकासाहेब शिंदे या आंदोलकाने जलसमाधी घेतल्याने आंदोलनाचे लोण राज्यभर पसरले आहे. मंगळवारी दादरच्या शिवाजी मंदिर येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीच्या बैठकीत बुधवारच्या मुंबई बंदचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारच्या बंदमधून काही जिल्हे वगळण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यंत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंददरम्यान निघणाऱ्या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार आणि हिंसा होणार नाही अशी माहिती समन्वय समितीचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली. मराठा समाजाबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा बैठकीत ठराव करण्यात आला.

पेण मध्ये मराठा संघटनाच्या वतीने मोर्चा

 

खोपोली शहरात एसटी बस सेवा बंद

खोपोली शहरातील बस स्टँड आणि सिटी बस स्टँडला एकही एसटी बस न आल्याने विद्यार्थी व प्रवासी खोळंबले, रिक्षा देखील बंद, अलिबाग, महाड, उरण येथे जनजीवन सुरळीत

१२ वीच्या बोर्डाची पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल

राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची आज पुर्नपरीक्षा असून बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, रिक्षा व बस बंद केल्या जात असल्याने परीक्षा केंद्र गाठताना विद्यार्थ्यांची तारांबळ

महाडमध्ये मोर्चा
महाडमध्ये मराठा संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाचे नेतृत्व आमदार भारत गोगावले करणार आहे.
बदलापूरमध्ये आज बंद नाही

मंगळवारी मराठा मोर्चाच्या वतीने बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद यशस्वी झाल्याने बुधवारी ठाणे जिल्ह्यात बंद असला तरी बदलापूरमध्ये बंद नसेल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवरील सर्व हॉटेल्स व फुड मॉल बंद

मराठा क्रांती मोर्चाने काल मंगळवारी महाराष्ट्रची बंद हाक दिल्यानंतर आता मुंबई बंद ची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवरील सर्व हॉटेल व फुड मॉल बंद ठेवले आहेत. अत्यावश्यक सेवा असलेले पेट्रोल पंप मात्र सुरू आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गवरील सर्व हॉटेल्स व फुड मॉल बंद

 

कल्याणमध्ये मोर्चेकरी रस्त्यावर

कल्याणच्या शिवाजी चौकात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. एका ठिकाणी बसची तोडफोड झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.

कल्याणमध्ये मोर्चेकरी रस्त्यावर

कर्जतमध्ये मराठा आंदोलनाला सुरुवात

कल्याण कर्जत आणि कर्जत मुरबाड राज्यमार्ग आंदोलकांनी आडवून ठेवला आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे. कर्जत तालुक्यात देखील महामार्ग आडवून मराठा समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. तर दुसरीकडे मुबई पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे आंदोलकांनी रोखून ठेवल्या आहेत.

मुबई पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे आंदोलकांनी रोखून ठेवल्या
कल्याण कर्जत आणि कर्जत मुरबाड राज्यमार्ग आंदोलकांनी आडवून ठेवला
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत