‘अटल बिहारी वाजपेयी’ नावाच्या महापर्वाचा अस्त

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे दिग्गज नेते एम्समध्ये पोहोचले आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमारास रुग्णालयातर्फे वाजपेयींच्या प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटिन दिले जाणार आहे.

 

 

LIVE UPDATE 

राजकारणातील महान व्यक्ती : राष्ट्रपती 

माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयी निधनाने मल अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्त्व, दूरदृष्टी आणि अद्भूत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व बनवतं. त्यांचं विराट आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आमच्या आठवणीत कायम राहिल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

अटल बिहार वाजपेयी यांच्या निधनाने एका युगाचा अंत झालं. ते देशासाठी जगले आणि दशकभर त्यांनी देशाची सेवा केली. त्यांचं कुटुंब, भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे लाखो पाठीराखे यांच्याप्रति सांत्वन व्यक्त करतो : वाजपेयी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया


3.45 PM : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एम्स रुग्णालयात पोहोचले

2.50 PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समधून बाहेर

वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयातून बाहेर पडले.

2.45 PM : वाजपेयींची प्रकृती चिंताजनक : राजनाथसिंग


1.56 PM : पतंप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत. सकाळपासूनच भाजपचे नेते आणि मंत्री रुग्णालयात पोहोचत आहेत. आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.


12.15 PM जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची प्रतिक्रिया – आपल्याला विसरुन चालणार नाही की अटल बिहारी वाजपेयी एक असे नेते आहेत, ज्यांची इच्छा होती भारताने अशी उंचा गाठावी, जिथे कोणताही देश स्पर्धाच करु शकणार नाही. ते शांतीप्रिय आहेत. डॉक्टरांशी माझी चर्चा झाली. प्रकृती अजूनही नाजूक आहे

12.05 PM – थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचणार

11.50 AM – अमित शाह भाजप मुख्यालयात दाखल

11.35 AM मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर दिल्लीला रवाना होण्याची शक्यता, अटल बिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत

11.20 AM – दिल्लीतील भाजप मुख्यालयातील हालचालींना वेग, कार्यालयातील फुलांचे हार काढले

11.08 AM – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनकच,अजूनही ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर : एम्सचं मेडिकल बुलेटीन

 

 

गुरुवारी सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर काही वेळातच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेदेखील रुग्णालयात पोहोचले.

 

66 दिवसांपासून रुग्णालयात

93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी आहेत. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त आहेत.

याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशातील अनेक महत्त्वाचे नेत्यांनी एम्समध्ये जाऊन अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. वाजपेयींना मूत्र संसर्ग झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं.

वाजपेयींना नेमका कोणता कोणता त्रास?

वाजपेयींनी किडनी संसर्ग, छातीदुखी, मूत्र संसर्ग हे त्रास आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या 66 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. याशिवाय त्यांना मधुमेह अर्थात डायबिटीज आहे. शिवाय त्यांची एकच किडनी काम करते. 2009 पासून ते आजारी आहेत. 2009 मध्ये त्यांना स्मृतीभ्रंशाचा झटका आला होता, तेव्हापासून त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे.

जिंदादिल राजकारणी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे केवळ देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झाले नाहीत, तर एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही आपलं व्यक्तिमत्त्व लोकांसमोर ठेवलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य बनलं आहे.

अटल बिहारी वाजपेयी मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर आहेत. ते आता 93 वर्षांचे आहेत.

तीन वेळा पंतप्रधान

अटल बिहारी वाजपेयी यांनी तीनवेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं.

पत्रकार, राजकारणी, कवी, लेखक

वाजपेयी हे केवळ राजकारणी नाहीत तर त्यांनी पत्रकार, कवी, लेखक अशा अनेक क्षेत्रात काम केलं आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं.

भारतरत्न

अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांचा अनेक वर्षांनी फोटो समोर आला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत