महाड तालुक्यातील पाचाड ते सांदोशी मार्गावर एसटी बस पलटली, चालकाच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याची प्रवाशांची तक्रार

महाड : सिद्धांत कारेकर 

महाड येथे सांदोशी बोरिवली या एसटीला आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कोंझर घाटात अपघात झाला. या अपघातामध्ये १४ प्रवासी जखमी झाल्याची माहिती एसटी मंडळाच्या महाड आगाराचे प्रमुख कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान हा अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची तक्रार गाडीतील प्रवाशांनी केलाय. यासंदर्भात संबंधित चालकांविरोधात कारवाई करण्यात येईल असे महाड आगाराचे व्यवस्थापक कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे . 

महाड आगारातून रोज सुटणारी सांदोशी बोरिवली ही  सांदोशी गावातून बोरिवलीकडे रवाना झाली होती. पाचाड या गावी गाडीमध्ये प्रवाशी भरल्यानंतर अपघात ठिकाणी येईपर्यंत गाडीतील विद्यार्थी आणि प्रवाशांनी चालक बनसोडे यांना गाडी वेगात न चालवायची वारंवार विनंती केली. मात्र चालकाने त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगामध्ये बस चालवत होते. मात्र वेगात असणाऱ्या बसवरून चालकांचा ताबा सुटला आणि एसटी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात पलटी झाली. अपघात झाल्यानंतर जखमी प्रवाशांवर पाचाड येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरु असून यापैकी काही जणांना उपचारांती सोडून देण्यात आले आहे.

रायगड माझासाठी सिद्धांत कारेकर महाड

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत