#MeToo आलिया भटच्या आईवरही झाला होता बलात्काराचा प्रयत्न

Related imageमुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

‘मी टू’ मोहिमे अंतर्गत अनेक स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडलेली असतानाच अभिनेत्री आलिया भटची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनीही त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराला वाट मोकळी करून दिली आहे. माझ्यावरही बलात्काराचा प्रयत्न झाला होता, अशी धक्कादायक माहिती राजदान यांनी दिली आहे. मात्र त्यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचं नाव उघड केलेलं नाही.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सोनी राजदान यांनी ही धक्कादायक माहिती दिली. ‘मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेले होते. तेव्हा माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यातून मी बचावले,’ असं राजदान यांनी सांगितलं. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाला बळी पडावं लागलं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तिविरोधात तक्रार केली असती तर त्याच्या कुटुंबीयांना त्रास झाला असता. त्या व्यक्तिला लहान मुलंही होती. त्यामुळेच मी गप्प बसले,’ असं त्या म्हणाल्या. ‘या घटनेनंतर काही झालंच नाही, अशा पद्धतीने मी वावरत होते. मी परिस्थितीला समोरे जाण्याचा प्रयत्न केला. अब्रू जाईल म्हणून नव्हे तर त्या व्यक्तिचं कुटुंब उद्धवस्त होईल म्हणून मी शांत राहिले,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वीही राजदान यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे. स्त्रिया जर त्यांच्यावरील अत्याचाराच्या गोष्टी उजागर करत नसतील तर त्यांच्या बद्दल वेगळी मतं तयार करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत