#MeToo नाना पाटेकर आता ‘हाऊसफुल-४ मध्‍ये काम करणार नाहीत-मल्हार पाटेकर

नवी दिल्‍ली : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for nana patekar

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्‍येष्‍ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्‍यामधील वादामुळे नाना पाटेकरांच्‍या करिअरवर परिणाम होताना दिसत आहे. ‘हाऊसफुल-४’मध्‍ये मुख्‍य अभिनय करत असलेल्‍या अक्षय कुमारने याआधीच चित्रपटाचे शूटिंग थांबवले आहे. तर दुसरीकडे नाना पाटेकर आता ‘हाऊसफुल-४ मध्‍ये काम करणार नाहीत. हा खुलासा खुद्‍द त्‍यांचा मुलगा मल्हार पाटेकरने केला आहे.

मल्हारने एका वृत्तसंस्‍थेशी बोलताना सांगितले की, ‘माझे वडील नाना कुणासाठीही संकटे उभे करणार नाहीत. त्‍यांच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या आरोपांमुळे त्‍यांनी हा चित्रपट न करण्‍याचा निर्णय घेतला आहे.’

एका इंग्‍लिश वेबसाईटच्‍या माहितीनुसार, ‘हाउसफुल-४’चे निर्माते नाना पाटेकरांच्‍या जागी दुसरा अभिनेता शोधत आहेत. अभिनेता संजय दत्त किंवा अनिल कपूर यांची वर्णी लागण्‍याची शक्‍यता आहे, असे एका रिपोर्टनुसार माहिती मिळते. याआधी ६ दिवस या चित्रपटाचे शूटिंग नानांनी जैसलमेरमध्‍ये पूर्ण केले आहे.

अक्षयने ट्विटरवर लिहिलं होतं की, ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला अस्वस्थ करणारे वृत्त ऐकायला मिळाले. म्हणून मी चित्रपट हाऊसफुल-४च्या निर्मात्यांना शूटिंग थांबवण्याची विनंती केली आहे. ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे’.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत