#MeToo: महिला स्वत:च्या फायद्यासाठी तडजोड करतात; भाजप आमदाराचे वक्तव्य

भोपाळ : रायगड माझा वृत्त 

 

सध्या देशभरात गाजत असलेल्या #MeToo मोहिमेसंदर्भात भाजप आमदार उषा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही महिला वैयक्तिक फायद्यासाठी स्वत:ची मूल्ये आणि विचारसरणीशी तडजोड करतात. त्यामुळे अनेकदा या महिला अडचणीत येतात. भारतात सध्या #MeToo चळवळ चुकीच्या मार्गावर चालल्याची टीका उषा ठाकूर यांनी केली.

अनेक क्षेत्रांमध्ये महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाला #MeToo चळवळीने वाचा फोडली होती. गेल्या काही दिवसांत बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी पुढे येत आपल्यावरील अन्यायाची कहाणी जगासमोर मांडली होती.

भाजपचे खासदार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर ९ महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

मात्र, उषा ठाकूर यांनी महिला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नैतिकता गहाण ठेवून तडजोड करत असल्याचे म्हटले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत