#MeToo : ‘हाऊसफुल ४’चं शूटिंग रद्द करण्याची अक्षयची मागणी

या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेते नाना पाटेकर यादोघांवर केलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे अक्षयनं निर्णय घेतला.

रायगड माझा वृत्त 

साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटांच्या निर्मात्यांकडे केली आहे.
दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारनं साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं चित्रीकरण तातडीनं रद्द करण्यात यावं अशी मागणी अक्षयनं ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे. अक्षय भूमिका साकारत असलेल्या हाऊसफुल ४ चा दिग्दर्शक साजिद खान आणि याच चित्रपटात काम करणाऱ्या नाना पाटेकर या दोघांवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत