Momo: ‘मोमो’वर देशात बंदी घाला!

मुंबई : रायगड माझा वृत्त

‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमनंतर आता देशभरातील पालकांना ‘मोमो’ गेमचे नवे आव्हान समोर आले आहे. अशा या बहुचर्चित मोमो गेममुळे पालकांसोबतच शिक्षकही चिंतातूर झाले आहेत. या गेमवर देशात बंदी घातली जावी, अशी मागणी मुंबईतील शिक्षकांकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी मुंबईतील शिक्षका परिषदेने थेट केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून दखल घेण्यास सांगितले आहे.

'momo' should be banned

देशभरात सध्या ‘मोमो’ या ऑनलाइन गेमचे थैमान सुरू असून सोशल नेटवर्किंग साइटवरही याच गेमची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. हे ‘मोमो’ व्हॉटस् अ‍ॅप चॅलेंज तरुणांना आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे. दरम्यान पश्मिम बंगालमध्ये या मोमो गेमविरोधात लेखी तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगलमधील जलपाईगुडी इथल्या या एका कॉलेज विद्यार्थिनीने ही मोमो विरोधातील तक्रार नोंदवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्या या गेममुळे पालकही झास्तावले आहेत. सध्या शाळकरी मुलांमध्येदेखील याच गेमची चर्चा सुरू असल्याचे शिक्षकांच्या कानी पडत असल्याने शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईतील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी याप्रकरणी थेट केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या गेमवर भारतात बंदी घालण्याची लेखी मागणी बोरनारे यांनी रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेमची दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आता मोमो चॅलेंच हा गेम समोर आला आहे. विद्यार्थ्यांना या गेमचे वाढते आकर्षण असल्यामुळे वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यासंदर्भात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्याकडे तक्रार केली असून या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.

मोमो चॅलेंज हा दुसरा घातक गेम भारतात आला आहे. भारत सरकारने यासाठी ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी नियमन आणणे ही काळाची गरज आहे. या नियमकांनी भारतात येणारा गेम आपल्या संस्कृतीला आणि देशाने ठरविलेल्या मापदंडांची पूर्तता करत आहे ना याची खात्री करून घ्यावी आणि नंतरच तो बाजारात आणावा.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत