MPSC पास होऊनही नियुक्ती रद्द, विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती रद्द झालेल्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी दिलं.

833 विद्यार्थी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदाची मुख्य परीक्षा आणि निवड परीक्षा पास झाले, मात्र काही नापास विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली. यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली असून आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आहे.याबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलं. सरकारने कोर्टात चांगला वकील देऊन ही केस मार्गी लावावी आणि आम्हाला नोकरीत सामील करुन घ्यावं, अशी या उमेदवारांची मागणी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत