PUBG खेळण्यासाठी महागडा मोबाईल न मिळाल्यानं तरुणाची आत्महत्या

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

PUBG हा मोबाईल गेम खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्याने 18 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

‘प्लेयर्स अननोन बॅटलग्राऊंड’ (PUBG) या ऑनलाईन गेमचं सध्या अनेकांना व्यसन लागलं आहे. मुंबईतल्या कुर्ला भागातील नेहरु नगर येथे राहणाऱ्या एका तरुणानं आपल्या पालकांकडे पबजी खेळण्यासाठी महागडा मोबाईल विकत घेण्याचा हट्ट धरला होता. मुलानं हट्ट धरलेला 37 हजार रुपये किंमतीचा स्मार्टफोन विकत घेणं पालकांना शक्य नव्हतं. त्यामुळे 20 हजार रुपयांपेक्षा महाग फोन आपण देऊ शकत नाही असं पालकांनी सांगितल्यानंतर निराश झालेल्या तरुणानं घरातच गळफास लावून आत्महत्या केली.

पबजी या ऑनलाईन गेमचं जगभरात अनेकांना वेड लागलेलं आहे. भारतातही अनेक जण हा गेम खेळण्यात तासनतास घालवतात. काही दिवसांपुर्वी या गेमवर बंदी आणण्यासंबंधी अहाद निझाम या 11 वर्षीय मुलानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं होतं. “या ऑनलाईन खेळामुळे हिंसेला प्रोत्साहन मिळत असून हत्या, आक्रमकता, व्यसन या गोष्टी समोर येत आहेत. हा खेळ बंद केला नाही तर मी कायदेशीर प्रक्रिया करणार आहे,” असं त्यानं आपल्या पत्रात लिहीलं होतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत