Tiktok व्हिडीओतील ‘या’ पठ्ठयाला रितेश देशमुखने ठोकला कडक सॅल्युट, मागितला फोन नंबर !

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 
Image result for riteish deshmukh
अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. वेगवेगळ्या मुद्यावर रितेश व्यक्त होत असतो. पण रितेशच्या ताज्या पोस्टबद्दल बोलाल तर एका जिगरबाज पठ्ठयाच्या कामगिरीने तो प्रचंड भारावल्याचे दिसतेय. होय, इतका की रितेशने त्याला कडक सॅल्युट ठोकला. इतकेच नाही तर नेटक-यांना त्याचा फोन नंबरही मागितला.

रितेशला इंप्रेस करणा-या या पठ्ठयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. नुकत्याच साज-या झालेल्या प्रजासत्ताक दिनी हा व्हिडीओ टिक टॉकवर शेअर झाला आणि क्षणात व्हायरल झाला. या व्हिडीओत दोन्ही पाय नसेलला हा पठ्ठा खांबावर चढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या खांबावर कोणताही झेंडा नाही. पण त्याच्या शरीरावर असणा-या तिरंग्यामुळे तरुण तेव्हा खांबाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा जणू काही तिरंगाच फडकत आहे असा भास होतो.

हा व्हिडीओ बघून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विट केले होते. प्रेरणा देणारा व्हिडीओ, असे महिंद्रा यांनी लिहिले होते. आता रितेश देशमुखने हा व्हिडीओ पाहून ट्विट केले आहे. ‘हा व्हिडीओ तुम्हाला प्रेरणा देत नसेल तर मग काय?  या व्यक्तीला मी सॅल्यूट करतो. कुणाकडे त्याचा मोबाईल नंबर असेल, तर मला द्यावा,’ असे रितेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत