VIDEO- बॅटिंग करताना विराटने दिली शिवी, स्टम्पवरील माइकमध्ये झाली रेकॉर्ड

( रायगड माझा ऑनलाईन टीम )

दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान वापरलेल्या शब्दामुळे कॅप्टन कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सेंच्युरियन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची बॅटिंग स्टाईल व ग्राऊंडवरील त्याचं अग्रेशन सगळ्यांच्याच चांगलं परिचयाचं आहे. सेंच्युरियन येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान वापरलेल्या शब्दामुळे कॅप्टन कोहली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मॅचच्या दरम्यान विराटने वापरलेल्या शब्दामुळे त्याला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

रविवारी झालेल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 335 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर भारताकडून मुरली विजय आणि के.एल राहुल बॅटिंगला मैदानात उतरले. ही जोडी सुरूवातीला भारतासाठी चांगला स्कोअर करायला अयशस्वी ठरली. के.एल राहुल 10 रन्स करून स्वस्तात बाद झाला. राहुलनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पण एकही रन न करता पुजाराही तंबूत परतला. यावेळी भारताचा स्कोअर 9.4 ओव्हरमध्ये 28/2 इतका होता. यानंतर मुरली विजयची साथ द्यायला कॅप्टन विराट कोहली मैदानात आला. दोन्ही खेळाडूंनी मॅचवर पकड मजबूत करत 28 ओव्हरमध्ये 80 रन्स बनवले. याच दरम्यान विराट कोहलीने मुरली विजयशी हिंदीमध्ये बोलत म्हणाला, “बहुत बढ़िया, अगर शाम तक खेलेंगे तो इनकी …… फट जाएगी।”

विराट कोहलीने मैदानात अतिशय अपमानास्पद शब्द वापरला. विराटचा हा शब्द स्टम्पवर असलेल्या माइकमध्ये रेकॉर्ड झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विराटने दिलेली शिवी स्पष्टपणे ऐकायला येते आहे. टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरूद्धची ही मॅच जिंकणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण टीम इंडियाने एकदाही यजमान संघाचा टेस्ट सिरिजमध्ये पराभव केलेला नाही.

व्हिडीओ पहा :

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत