Vivo V9 Pro विवोचा V9 Pro आज भारतात

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त

विवोने भारतात एका पाठोपाठ एक स्मार्टफोन लाँच करण्याचा सपाटाच लावला आहे. ‘विवो वी ११’नंतर आज ‘विवो वी ९’ प्रो भारतीय बाजारात धडकणार आहे. याआधीच्या ‘विवो वी ९’ची ही सुधारीत आवृत्ती असेल. विवोच्या नव्या स्मार्टफोनची किंमत १७,९९० रुपये असून हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. सध्या हा हँडसेट

काळ्या रंगात उपलब्ध असेल. ‘विवो वी ९ प्रो’ हा फोन सॅमसंग गॅलेक्सी जे ८ आणि शाओमी रेडमी ६च्या तोडीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

कसा आहे विवोचा हा नवा स्मार्टफोन

>> फुल व्ह्यू डिस्प्ले २.० टेक्नॉलॉजी
>> ६.३ इंच फुल एचडी + डिस्प्ले, आस्पेक्ट रेशो १९:९
>> स्क्रीन टू बॉडी आस्पेक्ट रेशो ९० टक्के
>> डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिला ग्लास
>> अँड्रॉइड ८.० ऑपरेटिंग सिस्टिम
>> क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६० चा प्रोसेसर
>> ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी रॉम, मेमरी वाढविण्याची सुविधा
>> ट्रिपल मेमरीकार्ड स्लॉट, दोन सिम कार्ड + १ मायक्रोएसडी कार्ड
>> १६ मेगापिक्सलचा एआय सेल्फी कॅमेरा विथ ब्युटी फेस फीचर
>> ड्युअल रिअर कॅमेरा
>> १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल रिअर कॅमेरा + एलइडी फ्लॅश
>> दोन दिवस टिकू शकणारी ३२६० एमएएच क्षमतेची बॅटरी
>> ४ जी, व्हिओएलटीई, ३ जी, वाय-फाय, ब्लू टूथ, जीपीएस

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत