WWE मधला केन झाला महापौर!

रायगड माझा ऑनलाईन ।

साधारण नव्वदीच्या दशकापासून WWE हा खेळ तरुण पिढीमध्ये लोकप्रिय आहे. हल्ली या खेळाची क्रेझ ओसरली असली तरी नव्वदीत तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेकांना या खेळाने भुरळ घातली होती, ही गोष्ट विसरुन चालणार नाही. याच काळात केन हा पहिलवान अनेकांच्या मनात धडकी भरवायचा. त्यामुळे लोकांना मुखवट्यामागील त्याचा चेहरा आणि इतर गोष्टींबद्दल प्रचंड उत्सुकता होती. हाच केन आता पुन्हा एकदा चर्चेत आहे.

WWE मधला केन झाला महापौर!

यावेळी केनच्या चर्चेत येण्यामागचे कारण ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. केनचे खरे नाव ग्लेन जेकब्स आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिकेच्या टेनेन्से प्रांतातील क्नॉक्स कंट्री या शहरातील महापौरपदाची निवडणूक जिंकली.

लिंडा हॅने यांना पराभूत करत ग्लेन जेकब्स महापौरपदी विराजमान झाले. रिपब्लिकन पक्षाकडून लढणाऱ्या जेकब्स यांना ३१,७३९ मते मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या हॅने यांना १६, ६११ मते मिळाली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत