Xiaomi चा नवा ब्रँड भारतीय बाजारात ; OnePlus 6 ला देणार टक्कर…

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

फार कमी वेळात भारतीय बाजारपेठेत आपले बस्तान बसविलेल्या Xiaomi या मोबाईल कंपनीने Mi नंतर नवा ब्रँड भारतीय बाजारात आणला आहे. Poco असे या ब्रँडचे नाव असून Poco F1 हा त्यांचा पहिला मोबाईल भारतात आज लाँच करण्यात आला.

Xiaomi Poco F1 या मोबाईलमध्ये 6 जीबी रॅम आणि 64/128 जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हर्जनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्लनल मेमरी देण्यात आली आहे. कंपनीचा हा प्रिमियम श्रेणीमधला फोन वनप्लस 6 आणि असुसच्या जेनफोन 5 झेड या फोनना टक्कर देणार आहे. हा फोन अँड्रॉईड 8.1 ओरियो या सिस्टमवर चालणार आहे.
या फोनची पहिली विक्री 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता केली जाणार आहे. यावेळी काही ऑफर्सही मिळणार आहेत.

विक्री आणि किंमत
पोको एफ1 या मोबाईलची विक्री फ्लिपकार्ट आणि एमआय.कॉम सुरु होणार आहे. 6/64 जीबी मोबाईलची किंमत 20,999, 6/128 जीबी मोबाईलची किंमत 23,999 आणि 8/256 जीबी मोबाईलची किंमत 28,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याचबरोबर एक आर्मड एडिशनची किंमत 29,999 ठेवण्यात आली आहे.

ऑफर्स
या फोनच्या विक्रीसाठी कंपनीने एचडीएफसी बँकेसोबत करार केला आहे. यानुसार 1000 रुपयांची सूट मिळणार आहे. तसेच Reliacne Jio च्या वापरकर्त्यांना 8000 रुपयांचा कॅशबॅक आणि 6 टेराबाईट पर्यंतचा डेटा मोफत मिऴणार आहे.

Poco F1 ची वैशिष्टे 
शाओमी या नव्या फोनमध्ये फुल एचडी प्लस नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉचला सेटींगमध्ये जाऊन बंद करता येऊ शकते. क्वॉलकॉम चा नवा स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर दिला आहे. तसेच लिक्विड कूल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.  यामुळे गेम खेळताना फोन तापण्याची शक्यता कमी झाली आहे. तसेच या फोनसाठी 9.0 पायची अपडेटही मिळणार आहे.

कॅमेरा
12 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स 365 आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी कॅमेरा असा ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 4000 एमएएचची बॅटरी क्विक चार्ज होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत